ताज्या घडामोडीमुंबई

नरिमन पॉईंट ते कुलाबा! मुंबईकरांसाठी लवकरच होणार तिसरा सी-लिंक

मुंबई | मुंबईत आता आणखी एक सी-लिंक उभारला जाणार आहे. नरिमन पॉईंट ते कुलाबा असा हा सी-लिंक दोन वर्षात पूर्ण होणार असून मुंबईकरांना ट्रॅफिकमधून मुक्तता मिळणार आहे. या सी लिंकबाबत एमएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया सुरू आहे.

या सी-लिंकची लांबी नरिमन पॉईंट ते कुलाबा सी लिंक १.६ किमी असणार आहे. मच्छीमारांच्या बोटींना अडथळा येऊ नये यासाठी पूल बांधला जाणार असून समुद्रादरम्यान १०० मीटरचे अंतर ठेवले जाणार आहे. सी लिंकवर सायकलिंक ट्रॅक, नागरिकांना चालण्यासाठी वेगळा ट्रॅक असेल. तसेच पुलावरून समुद्र पाहण्यासाठी गॅलरीही असणार आहे. नरिमन पॉईंट ते कुलाबा या सी-लिंकचे काम मे महिन्यात सुरू होणार आहे. तर दोन वर्षात हा सी-लिंक पूर्ण करण्याचा उद्दिष्ट आहे. यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकमधून मुक्तता मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button