breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

N-95 मास्कचा वापर करताय, सावधान! सरकारने दिला न वापरण्याचा इशारा

मुंबई – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र जर तुम्ही कोरोनापासून वाचण्यासाठी N-95 मास्कचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आहे. कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता सरकारने मास्कबाबत एक निर्देशक जारी केले आहे. यात N-95 मास्क धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारचे आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून N-95 मास्कचा वापर थांबवण्यास सांगितले आहे. सरकारने सांगितले आहे की, N-95 मास्क मधील व्हॉल्व्ह कोरोनाव्हायरसला बाहेर काढण्यास मदत करत नाही. N-95 मास्क कोरोना संसर्ग रोखण्यात पूर्णपणे अपयश ठरला आहे.

केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून लोकांकडे व्हॉल्व्ह असलेले N-95 मास्क न वापरण्याबाबत आदेश जारी करण्यास सांगितले आहे. यात असे म्हटले आहे की, या मास्कमुळे विषाणूचा प्रसार थांबणार नाही. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहून म्हटले आहे की, लोकं N-95 मास्काचा वापर अयोग्य पद्धतीने करत असल्याचे उघडकीस आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button