breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“मुस्लीम खातात व मुलं जन्माला घालतात, त्यांना कोण…;” भाजपा मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली |

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकारण चांगलेच तापायला लागले आहे. राजकीय पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका करण्याची पातळी देखील घसरत आहे. अशातच उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मंत्री बलदेवसिंग औलख यांनी मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री बलदेवसिंग औलख यांनी मंगळवारी म्हणाले की मुस्लिम समुदायाला फक्त मुलं कशी जन्माला घालायची हेच माहित आहे. पत्रकारांनी त्यांना एमआयएम नेते गुफरान नूर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारत होते, यावेळी ते म्हणाले की “मुस्लीम आधीच मुलं जन्माला घालत आहेत. त्यांना कोण रोखतंय? ते फक्त खातात आणि मुलं जन्माला घालतात. त्यांना त्यांच्या मुलांनी चांगल्या संस्थांमध्ये शिकावे आणि प्रगती करावी, असे वाटत नाही,” असं मंत्री ओखला म्हणाले.

  • काय म्हणाले होते गुफरान नूर…

एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील, असे म्हणताना दिसले होते. गुफरान नूर म्हणतात की, “जर मुस्लिमांना जास्त मुलं होणार नाहीत, तर मग आपला समाज भारतावर राज्य कसा करणार?. आपली संख्या जास्त नसेल तर असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील, शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होतील.”

“ दलित, मुस्लिमांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखण्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही का मुलं जन्माला घालू नयेत? हे आमच्या शरियतच्या विरोधात आहे,” असंही ते म्हणाले होते. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नूर यांनी स्पष्टीकरण देत “जेवढा सहभाग आम्ही बलिदानात दिलाय, आमचा तेवढा सहभाग मुलं जन्माला घालण्यात नाही. ओवेसी साहेब पंतप्रधान व्हावेत, ते कसे होईल, अशी चर्चा सुरू होती, त्यात मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले. आणि त्यात मी काहीही चुकीचे बोललो नाही,” असं ते म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button