ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भांडणाच्या रागातून एकावर खुनी हल्ला; तिघांना अटक

पिंपरी चिंचवड | किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांनी मिळून एकावर खूनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री दहा वाजताच्या सुमारास भोसरी एमआयडीसी मधील महात्मा फुले नगर येथे घडली.राहुल बाळासाहेब साळुंके वय 32, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक महेंद्र तायडे वय 22, आशिष महेंद्र तायडे वय 25, गणेश नामदेव काळे वय 32, सर्व रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल आणि आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्यात, हातावर, पाठीवर, कमरेवर आणि हनुवटीवर गंभीर दुखापत झाली. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button