पिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी l प्रतिनिधी

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आठ जणांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली.

मुस्तफा अफजल शेख (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 26) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुलदीप, गोविंद आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी ‘याला आता जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणून लोखंडी रॉड आणि तलवारीने फिर्यादी यांच्यावर वार केले. तसेच फिर्यादी यांचा मित्र शुभम सिंग यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी केले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button