ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जुन्या भांडणाच्या कारणातून एकाचा खून

पिंपरी चिंचवड | जुन्या भांडणाच्या कारणातून एकाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 3 ते 4 जणांविरोधात भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थरमॅक्स चौक, निगडी ते खडी मशीन रोड, मोशी यादरम्यान 29 ते 30 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला आहे.बबन बाबासाहेब केंगार असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.31) भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर अनिल सरोदे, गौरव सरोदे, अनिल सरोदे व त्यांच्या इतर मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने बबन केंगार यांना सायकलवर बसवून दूर घेऊन गेले. तिथे त्यांना मारहाण करून खून केला. जुन्या भांडणाच्या कारणातून हा खून केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एम आय डी सी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button