पिंपरी / चिंचवड

मोरवाडीत चाकूने भोकसून तरुणाचा खून

पिंपरी l प्रतिनिधी

मोरवाडी, पिंपरी येथे चाकूने भोकसून एका तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दीपक राधेशाम यादव यादव (वय १९, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक प्रकाश पोटघन (वय १९, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ प्रकाश कलापुरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. तीन दिवसांपूर्वी दोघांचा कॉमन मित्र अनिकेत कराळे याने त्याचा टेम्पो आरोपी दीपक याला कमी भाड्यात दिला नाही. याचा राग दीपक याला आला. त्यानंतर दुसरा मित्र सोमनाथ कलापुरे याने आरोपीला विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्यावरून दीपक यादव याने सोमनाथ कलापुरे याच्या पोटात चाकूने भोकसून त्याचा खून केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button