TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

शेलपिंपळगाव येथे गोळ्या झाडून पैलवानाचा खून

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथे तीन जणांनी मिळून एका पैलवानावर पाच ते सहा गोळ्या झाडत त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. भर चौकात हा प्रकार घडल्याने शेलपिंपळगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागेश सुभाष कराळे ( वय 37, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कराळे हे पुणे जिल्ह्यातील एका नेत्याच्या जवळचे नातेवाईक आहेत. ते तालीम चालवत असल्याने त्यांची परिसरात पैलवान अशी ओळख आहे.
गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कराळे त्यांच्या जीपमध्ये बसत होते. ते जीपमध्ये बसले असता एका कार मधून तीन आरोपी आले. त्यांनी कराळे यांच्यावर पिस्तूलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यात कराळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कराळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी कारमधून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेच परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी लावली.
कराळे यांना चार गोळ्या लागल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा प्रकार जुन्या वादातून झाल्याचेही म्हटले जात आहे. भर चौकात अशा पद्धतीने निर्घृणपणे हत्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश येत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button