ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरगुती कारणांवरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून; पती पोलीस ठाण्यात हजर

पिंपरी चिंचवड | घरगुती कारणांवरून पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून तिचा खून केला. ही घटना आज (मंगळवारी, दि. 23) सकाळी नेहरूनगर, पिंपरी येथे उघडकीस आली.जेनल अजमुद्दीन चाकोरे (वय 35, रा. रसरंग चौक, नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अजमुद्दीन अल्लाउद्दीन चाकोरे (वय 38) असे आरोपी पतीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयत जेनल आणि आरोपी अजमुद्दीन हे पती-पत्नी होते. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वाद होत होता. त्यातूनच अजमुद्दीन याने जेनल यांच्या डोक्यात घरातील पाटा घालून त्यांचा खून केला.

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी अजमुद्दीन पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button