पिंपरी / चिंचवड

पवारवस्ती मध्ये एकावर खुनी हल्ला

पिंपरी l प्रतिनिधी

मित्राच्या दुकानातून कपडे खरेदी करून मित्रासोबत घरी निघालेल्या सात जणांच्या टोळक्याने अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. ‘आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो’ असे म्हणत मारहाण करून एकावर चाकूने खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 16) मध्यरात्री बारा वाजता पवारवस्ती चिखली येथे घडली.

राहुल रमेश रेड्डी (वय 18, रा. कासारवाडी), गणेश पवार (रा. पवारवस्ती, चिखली) अशी जखमींची नावे आहेत. राहुल यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश क्षीरसागर, दानेश, आदित्य पुजारी, गणेश चंद्रकांत सिंगुलवार (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली), सिराज अन्सारी, बाजीराव मिसाळ, अक्षय शेडगे (रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री त्यांचा मित्र गणेश पवार याच्या  खरेदी करण्यासाठी गेले. कपडे खरेदी केल्यानंतर रात्री उशिरा ते दुकानातून घरी पायी चालत निघाले. गणेश पवार सोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी एका रिक्षातून आले. त्यांनी गर्दी जमवून कमलेश क्षीरसागर याने ‘का रे तुला मस्ती आली का. तू भाई झाला का’ असे म्हणून रॉडने गणेशला मारले.

त्यानंतर आरोपी दानेश याने ‘आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो’ असे म्हणत गणेशला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी राहुल हे भांडण सोडविण्यासाठी गेले. सिराज अन्सारी याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीवर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. पोलिसांनी गणेश सिंगुलवार याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button