ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरगुती वादातून चुलत भावावर खुनी हल्ला

पिंपरी चिंचवड | घरगुती वादातून चुलत भावाने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करत खुनी हल्ला केला. यामध्ये चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.खंडू बबन शिरसाठ (वय 43, रा. नढे नगर,काळेवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा चुलत भाऊ गणेश मदन शिरसाठ (वय 36, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंडू शिरसाठ आणि त्यांचा चुलत भाऊ आरोपी गणेश शिरसाठ यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून गणेश याने फिर्यादी यांच्यावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

फिर्यादी खंडू शिरसाठ हे शिवसेनेचे विभाग संघटक आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button