ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका ‘यूटीडब्ल्यूटी’ पद्धतीने रस्ता विकसित करणार

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्ता ‘यूटीडब्ल्यूटी’ पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.प्रभाग क्रमांक 31 अंतर्गत सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्ता ‘यूटीडब्ल्यूटी पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी 8 कोटी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग शुल्क वगळून 8 कोटी 16 लाख रुपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या.

त्यानुसार 8 ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यांपैकी ‘साईप्रभा कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदाराने निविदादरापेक्षा 27.96 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 5 कोटी 87 लाख रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस 4 लाख 27 हजार आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेसपोटी 9 लाख 18 हजार रूपये असे एकूण 6 कोटी 1 लाख 42 हजार रुपये खर्च होणार आहेत. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button