breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सेवन स्टार रॅकींग’साठी महापालिका सज्ज

  • नागरिकांकडून हरकती, सुचना मागवणार

पिंपरी – स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ अंतर्गत पिंपरी – चिंचवड शहरासाठी सात तारांकित नामांकन (सेवन स्टार रॅकींग) आणि वॉटर प्लस प्रमाणिकरणाकरिता केंद्र सरकारने तयार केलेले नियम महापालिका पूर्ण करत आहे. त्याअनुषंगाने सेवन स्टार नामांकनासाठी महापालिका नागरिकांकडून हरकती व सुचना मागविणार आहे. त्यानंतर राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या धर्तीवर राज्यात १५ मे २०१५ पासून ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानाअंतर्गत सर्व शहरे हागणदारी मुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा या अभियानात समावेश आहे. या अभियानाअंतर्गत पिंपरी – चिंचवड महापालिका स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ ची अंमलबजावणी करत आहे. त्या अनुषंगाने शहराचे हागणदारी मुक्त उद्दीष्ट, वॉटर प्लस आणि कचरामुक्त शहराचे स्टार रेटींग जाहीर करणे आवश्यक आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ अंतर्गत शहरासाठी सात तारांकित नामांकन (सेवन स्टार रॅकींग) आणि कचरामुक्त शहराकरिता केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमावली, मार्गदर्शक सुचना व कार्यपद्धतीनुसार महापालिका उपाययोजना करत आहे. कचरामुक्त शहराचे सात तारांकित नामांकन ठरविताना घरोघरचा कचरा गोळा करणे, निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीया करणे, कचरा वाहतुक व प्रक्रीयेसाठी केलेली व्यवस्था, गटार, नाले व सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छता अ‍ॅपचा वापर, प्लास्टीक बंदी कार्यवाही, तसेच मॅकेनिकल कंपोस्ट प्लांट, प्लास्टीक टू फ्युअल ची व्यवस्था केली आहे का, याची पाहणी करण्यात येते. तसेच वॉटर प्लससाठीही केलेल्या उपाययोजना, सांडपाणी, भुयारी गटारे यांची व्यवस्था, सांडपाण्यावर प्रक्रीया प्लँट, पाण्याचा पूर्नवापर, ड्रेनेज लाईन देखभाल-दुरूस्ती याचीही पाहणी करण्यात येते. त्यानुसार, या नामांकनासाठी जनतेकडून हरकती व सुचना १५ दिवसांच्या कालावधीत मागवण्यात येणार आहेत. त्यांची पडताळणी करून मानंकाबाबत समाधान असल्याचा प्रस्ताव सरकारला सादर करेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button