breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांडपाणी प्रक्रिया अन् पुन:वापर प्रकल्पांसाठी महापालिका सकारात्मक!

नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांचा प्रकल्प भेट दौरा

महापालिका पर्यावरण विभागाच्या कामकाजाची पाहणी

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अन् पुन:वापर प्रकल्पांसाठी महापालिका प्रशासन सकारत्मक पुढाकार घेणार आहे, असे संकेत नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
पिपरी-चिंचवड महानगरपालिका नवनिर्वाचित आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतेच पर्यावरण विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहरातील विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. यावेळी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता हरविंदर बन्सल, कनिष्ठ अभियंता श्री. शितोळे, श्री. भोसले आदी उपस्थित होते.
महापालिका हद्दीत ज्या भागांमध्ये पाणीसमस्या जाणवते, अशा भागांमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून आणखी ‘एसटीपी’ आणि ‘टर्शरी प्लँट’ उभारण्यात येतील. त्याद्वारे मिळणारे प्रक्रियायुक्त पाणी पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी टंचाईग्रस्त भागांमध्ये पुरवठा करता येईल. त्यामुळे प्रशासनाने कामाला लागावे, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या आहेत.
आयुक्त पाटील यांनी ‘एसटीपी’ आणि टर्शरी प्लँटची पाहणी केली. चिंचवड, आकुर्डी, चिखलीसह शहरातील प्रमुख एसटीपी प्लँटला प्रत्यक्ष भेटही दिली. ज्या ठिकाणी एसटीपी प्लँट आहेत. त्यासाठी आता टर्शरी प्लँट उभारण्याबाबत प्रशासन अनुकूल आहे. त्यासाठी शहरातील पाणीसमस्या असलेल्या भागात प्रामुख्याने प्रकल्प उभारणीवर भर देण्यात येणार आहे. त्याद्वारे पिण्याव्यतिरिक्त पाणी वापरासाठी स्त्रोत निर्माण होईल. परिणामी, पाणी पुरवठ्यावर होणारा ताण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. त्याकरिता पर्यावरण विभागासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असा विश्वास आयुक्त पाटील यांनी दिला आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांनी दिली.
**
शहरातील सांडपाणी प्रकल्पाला भेट…
चिखली येथे महापालिका प्रशासनाने शहरातील पहिला ५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि टर्शरी प्लँन्टीची उभारणी केली. या प्रकल्पालाही आयुक्त पाटील यांनी भेट दिली. प्रकल्पाच्या कामकाजाचे कौतुक केले. या प्रकल्पातून निर्माण होणारे प्रक्रियायुक्त पाणी मोशी येथील कचराडेपोसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवर शहरात आवश्यक ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया आणि पुन: वापर प्रकल्प उभारण्याबाबत महापालिका प्रशासन अनुकूल आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button