breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

मुंडे भगिनी नाराज नाहीत, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस संतापले

नाशिक | प्रतिनिधी

बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना संधी न दिल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बजावले. देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

पुढे फडणवीस म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेत असतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. नव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार लोकांना संधी देण्यात आली आहे. त्यांना खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असं सांगतानाच नाशिक जिल्ह्याला ५० वर्षानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालं, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूदही केले.

नारायण राणे (Narayan Rane) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेण्यात आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ईडीकडून (ED) होत असलेल्या चौकशीबाबत जास्त बोलण्याचे टाळले. याबाबत जे काही बोलायचं ते ईडीचे अधिकारी बोलतील. मी ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे विन्डिक्टिव्ह काम करण्याची प्रथा नाही, असं त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button