breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबई

मुंबईकर महिलेला स्वस्तात महाराजा भोग थाळीचं आमिष भोवलं… २०० रुपयांच्या नादात थेट ८ लाख गमावले

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराजा भोग थाळीच्या लोभापायी एक महिला सायबर फ्रॉडची बळी ठरली आहे. साधारणपणे १२०० ते १५०० रुपयांची महाराजा भोग थाळी अवघ्या २०० रुपयांमध्ये मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडल्याने महिलेची तब्बल ८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ५४ वर्षीय महिलेने सोशल मीडियावर २०० रुपयांची १+१ ऑफर पाहिल्यानंतर लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकामागून एक २७ व्यवहार झाले. लवकरच खात्यातून ८ लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्याकडे काही बचत आणि शेअर्स आहेत. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांना फेसबुकवर महाराजा भोग थाळीची जाहिरात आली. त्यांनी लिंकवर क्लिक केले. यामध्ये बँक डिटेल्स आणि मोबाईल नंबर भरण्यास सांगितले होते. त्यांनी तपशील भरला. तेवढ्यात त्यांना फोन आला. त्यानंतर मेसेजमध्ये दुसरी लिंक आली. ज्याचा वापर त्या त्यांच्या बँक सोबतच डेबिट कार्डच्या डिटेल्ससाठी करायची.

फसवणूक करणार्‍याने नंतर झोहो असिस्ट हे रिमोट ऍक्सेस अॅप डाउनलोड केले आणि इंस्टॉल केले, ज्याचा वापर त्यांच्या फोनवर पाठवलेल्या वन-टाइम पासवर्ड वाचण्यासाठी केला गेला. फसवणूक करणाऱ्याने २७ व्यवहारांमध्ये त्यांच्या खात्यातून ८ लाख ४६ हजार रुपये ट्रान्सफर केल्याचे समजते.

खात्यातून वेगाने पैसे ट्रान्सफर होत असल्याचे पाहून महिला अस्वस्थ झाली. तिने लगेच बँक गाठली. गुरुवारी सुमारे २४ व्यवहार झाले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी आणि ६६ डी अंतर्गतही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button