ताज्या घडामोडीमुंबई

ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद

२४ तासांचा शटडाऊन घेऊन बंद ठेवण्यात येणार

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ते बुधवार रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेऊन बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरण कंपनीमार्फत शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथील पाईपलाईन गळती होत असून ती बंद करण्याचे आवश्यक कामे करण्यात येणार असल्याने या कालावधीत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्या टप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रहम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डॉगरीपाडा, वाघबीळ, आदी ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजे पर्यंत बंद राहील व समतानगर, प्रऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्य्राचा काही भाग मंगळवारी रात्री ०९ ते सकाळी ९ पर्यंत बंद राहील.

हेही वाचा     :      ‘महाराष्ट्राची काय अवस्था झालीय?’ विधीमंडळातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले 

अशा रितीने टप्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. या शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा. ठाणे पालिकेस सहाकार्य करावे अशी विनंती पाणी पुरवठा विभागाने केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button