#SSRCase: रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडे ट्विट, प्रतिक्रियांचा सूर मात्र बदलला
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली आहे. यानंतर रियाला अटक करण्यात आली. रियाला अटक केल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अंकिताने ट्विट करुन लिहिले आहे की, भाग्य आणि योगायोगाने काहीही होत नाही..तुम्ही आपल्या कर्माने आपलं भाग्य बनवतात.
श्वेता सिंह कीर्तिच्या प्रतिक्रियेवर अंकिता लोखंडेने केली कमेंट
याशिवाय सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ति यांच्या पोस्टवर अंकिता लोखंडेने कमेंट केलेली आहे. तिने अनेक ह्रदयाचे इमोजी शेअर करीत लिहिले – Diiiiiiiiiiiii…रियाच्या अटकेनंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तिने एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करीत आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे. त्यांनी हात जोडणारी इमोजी शेअर करीत लिहिलेले आहे की – देव आपल्यासोबत आहे.