ताज्या घडामोडीमुंबई

नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयकडून मोठी कारवाई

याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक, शशीकुमार पासवानचा देखील समावेश

मुंबई : नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये पेपर लीक प्रकरणातील मुख्य सुत्रधार शशीकुमार पासवानचादेखील समावेश आहे. तर इतर दोन जण एमबीबीएसचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सीबीआयने अटक केलेले दोन्ही विद्यार्थी हे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कुमार मंगलम बिश्नोई आणि दिपेंद्र कुमार, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी कुमार मंगलम बिश्नोई हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत तर दिपेंद्र कुमार प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. हे तिन्ही जण पेपर सोडवण्यासाठी ५ मे रोजी सकाळी हजारीबागेत उपस्थित होते, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने यापूर्वी पटना एम्समधील एमबीबीएसच्या चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तसेच एनआयटी जमशेदपूर येथील एका अभियंत्यालादेखील अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सीबीआयने तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत बिहार पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button