ताज्या घडामोडीमुंबई

येत्या शनिवारपासून मुंबईत तापमान वाढणार

31 मार्चपर्यंत हे तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल,उकाडा वाढणार

मुंबई : मुंबईतील हवामानात पुन्हा एकदा बदल होऊ लागला आहे. दरम्यान, येत्या शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून उकाडा वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याकडून शेवटच्या आठवड्यापासूनच कमाल तापमान 36 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये 33 अंश सेल्सिअस असं तापमान आहे.

हेही वाचा –  ‘हुक्का पार्लर चालवत असल्यास हॅाटेलचे परवाने रद्द करणार, कायद्यात बदल करुन कडक अंमलबजावणी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या शनिवारपासून तापमान वाढणार असून 31 मार्चपर्यंत हे तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. यादरम्यान आकाश निरभ्र असणार आहे. यासोबतच एप्रिल महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या महिन्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button