गौतम अदानी यांनी 9 देशांच्या महिला दूतांना विशेष आदर देऊन सन्मानित केले.
अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि मुंद्रा येथील SEZ ला त्यांनी दिलेली भेट हा आमच्यासाठी आनंददायी क्षण

पुणे : आज 8 मार्च, जगभरात जा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. दरम्यान, गौतम अदानी यांनी 9 देशांच्या महिला दूतांना विशेष आदर देऊन सन्मानित केले. यासदंर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली. “या प्रेरणादायक दूतांचा सन्मान करण्याचे भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाले आहे. अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि मुंद्रा येथील SEZ ला त्यांनी दिलेली भेट हा आमच्यासाठी आनंददायी क्षण होता ” असे अदानी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलं होतं.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाअगोदर, या दूतांनी गुजरातमधील खावडामधील अदानी ग्रीन एनर्जीद्वारे चालविलेल्या जगातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि मुंद्रामधील अदानी पोर्ट्स आणि SEZ लिमिटेडद्वारे चालविलेल्या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक बंदरांना भेट दिली.
हेही वाचा- शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा खासदाराला अटक का नाही? राऊतांचा संतप्त सवाल
भारताच्या औद्योगिक, आर्थिक आणि ऊर्जा परिवर्तनामध्ये महिला व्यावसायिक आणि अभियंत्यांनी दिलेल्या योगदान पाहून ते दूत आश्चर्यचकित झाले. हे देशाच्या भविष्यात महिलांचा वाढता प्रभाव दर्शवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.
भारताच्या सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी, जगातील सर्वात मोठ्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पाचे विकास करत आहे. 538 चौरस किलोमीटर क्षेत्रात उभारला जात असलेला हा प्रकल्प पॅरिसच्या पाचपट मोठा आहे आणि मुंबईपेक्षा देखील मोठा आहे.
या भेटीवेळी इंडोनेशिया, लिथुआनिया, मोल्डोव्हा, रोमेनिया, सेशेल्स, स्लोव्हेनिया, लेसोथो, एस्टोनिया आणि लक्सेमबर्गसारख्या देशांच्या महिला दूत आणि उच्चायुक्त उपस्थित होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला महत्व देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या अदानी समूहाच्या अत्याधुनिक सौर ऊर्जा उत्पादन युनिटला देखील या सर्वांनी भेट दिली.
“महिला सशक्तिकरणाला इतके महत्त्व देण्यात आलेले पाहून मला आश्चर्य वाटले. युवती आणि महिलांनी देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी समर्पित होऊन त्यांना प्रोत्साहित करताना पाहून मला खूप आनंद झाला. त्यामुळे, मला खूप चांगला आणि आनंददायक अनुभव मिळाला. अदानी फाउंडेशनने केलेल्या उत्कृष्ट कामासाठी धन्यवाद,” असे त्यांनी नमूद केलं.