ताज्या घडामोडीमुंबई

गणेशोत्सव आता होणार महाराष्ट्र राज्य महोत्सव!

ना. आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी गणेशोत्सवाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली. सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजप आमदार हेमंत रासणे यांनी सभागृहात गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्यावर भर दिला आहे. “सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. पण आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

हेमंत रासने यांच्या या मागणीला मंत्री आशिष शेलार यांनी दुजोरा देत उत्तर दिले. महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरु होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता आपण महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे आजच मी स्षप्टीकरण देतो. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्यापती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहिल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन

देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवाबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी नमूद केले.
आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

“शंभर वर्षांच्या परंपरेला कोणी खंडित केले असेल, तर ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. गणेशोत्सवावर काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले होते, पण आपल्या सरकारने ते दूर केले आहे.” असे आशिष शेलारांनी म्हटले. या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारची ही भूमिका गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button