मला फरार बोला पण चोर नको – विजय माल्या
किंगफिशर एअरलाईन्सच्या अपयशामुळे फरार उद्योजक विजय माल्या याची माफी

मुंबई : फरार उद्योजक विजय माल्या याने किंगफिशर एअरलाईन्स बंद झाल्यामुळे माफी मागतली आहे. शिवाय चोरीच्या आरोपांना देखील विजय माल्याने फेटाळलं आहे. एवढंच नाही तर, विजय माल्या भारत सोडून यूके याठिकाणी का स्थायिक झाला? असे अनेक खुलासे विजय माल्या याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केले आहे. 2008 च्या आर्थिक मंदीचा उल्लेख करताना मल्ल्या म्हणाला, त्याचा परिणाम त्याच्या कंपनीवर तसेच संपूर्ण देशावर झाला.
मला फरार बोला पण चोर नको – विजय माल्या
राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये विजय माल्या म्हणाला, ‘किंगफिशर एअरलाईन्सच्या अपयशामुळे मी सर्वांची माफी मागतो.’ यावेळी विजय याने माफी तर मागितली पण त्याने भारतापुढे एक मोठी अट देखील ठेवली आहे. ‘जर मला भारतात निष्पक्ष खटला आणि सन्माननीय जीवन मिळण्याची खात्री मिळाली तर मी भारतात परतण्याचा गंभीरपणे विचार करेन. तुम्ही मला फरार म्हणू शकता पण चोर नाही. चोरचा अर्थ काय असतो तुम्हाला माहिती आहे का? मी पळालेलो नाही. मी भारतातून पूर्वनियोजित यात्रेवर आलो आहे.’ असं देखील माल्या म्हणाला.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विजय माल्यावर काय आहेत आरोप?
विजय मल्ल्यावर भारतीय बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले 9 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. भारत सरकार विजय मल्ल्याला कायदेशीररित्या भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. 2018 मध्ये युकेच्या एका न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय दिला. अन्याय्य वागणूक आणि मीडिया ट्रायलचा हवाला देत तो भारतात परतण्यास विरोध करत आहे.
सीबीआय आणि ईडीच्या आरोपांवर विजय माल्याचं उत्तर
पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्याने सीबीआय आणि ईडीच्या आरोपांनाही उत्तर दिलं. सीबीआयने माझ्यावर ब्रँड व्हॅल्युएशन आणि खाजगी जेटचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ईडीने 3547 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे, परंतु एअरलाइनच्या 50% खर्च परकीय चलनात होते. त्याला मनी लाँड्रिंग म्हणणे मूर्खपणाचे आहे.” मल्ल्याच्या मते, त्याने आयडीबीआय बँकेचे 900 कोटी रुपयांचे कर्ज देखील परत केलं आहे.