कॅडल रोड परिसरातील मखदुम शाह दर्ग्याजवळ अग्नितांडव
सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली आग, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी

मुंबई : मुंबईतील माहीमधील कॅडल रोड परिसरातील मखदुम शाह दर्ग्याजवळ अग्नितांडव पहायला मिळाले. मखदुम फूड स्टोअरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ही आग फक्त दुकानाच्या परिसरातच मर्यादित त्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेतील मृतांवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुर आहेत.
सिलिंडरचा मोठा स्फोट
समोर आलेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास मखदुम फूड स्टोअरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत अनेक लोक जखमी झाले होते.
हेही वाचा – ‘मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो’; संजय शिरसाट
एकाचा मृत्यू
या घटनेत नूर आलम, वय 38 यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रवीण पुजारी वय 34 हे गंभीर जखमी झाले आहेत. तर मुकेश गुप्ता वय 34, शिवमोहन वय 24, दीपाली गोडतकर वय 24, सना शेख वय 25, श्रीदेवी बंदिछोडे वय 31, कमलेश जयस्वाल वय 22 हे लोक जखमी झाले आहेत. या सर्वांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.