Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मराठ्यांबाबत काँग्रेसची भूमिका कायम कपटीपणाची : चंद्रकांत पाटील

मुंबई : कर्नाटक सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी ‘मराठा विकास मंडळ’ स्थापन केले आहे. तसेच यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील पाहण्यास मिळत आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मराठ्यांबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटीच राहिली, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी येडीयुरप्पा यांच्या महामंडळाची घोषणा केली असून त्यांच्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सिद्धरामैया म्हणाले की, कन्नड आणि मराठी लोकांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांसाठी केलेले कोणतेही काम योग्य ठरणार नाही. सिद्धरामैया यांच्या मते, यामुळे कन्नड लोकांच्या भावना दुखावल्या जातील.

सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातदेखील काँग्रेसचा मराठ्यांबद्दल असाच स्वभाव पाहायला मिळाला आहे. आधी सरकारने काही न काही घोळ करून आरक्षणात अडचणी निर्माण केल्या, त्यानंतर सारथीला नुकसान पोहोचवून अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा बरखास्त करून टाकले. काँग्रेस पक्ष भले ही महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, दिल्लीचा असो वा इटलीचा… सर्वच भारत आणि भारतीयांच्या विकासाचे शत्रू आहेत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेता सिद्धरामैया यांच्या या वक्तव्याबद्दल अगदी चिडीचूप मुक्या-बहिऱ्यासारखे पाहत राहतील. यांनी ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला आहे आणि ना मराठा समाजासाठी काही चांगली गोष्ट केली आहे. सत्तेची लाचारी… काँग्रेस विचारांनीसुद्धा भ्रष्टाचारी, असा निशाणा त्यांनी साधला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button