Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध

मुख्यमंत्र्यांकडे केली राऊतांच्या राजिनाम्याची मागणी

मुंबई । प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  यांनी ‘डॉक्टरला काय कळतं…डॉक्टरपेक्षा कंपाउंडर जास्त जाणतात…’ असे वक्तव्य केले. त्याचा विरोध डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणीही केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,

आम्ही संजय राऊत सारख्या ज्येष्ठ राजकारणीच्या विरोधात आहोत. “कंपाऊंडर्स डॉक्टरांपेक्षा अधिक जाणतात” अशी भाषा करणाऱ्या राऊत यांचा आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याचा राजीनामा मागतो. डॉक्टर मानसिकदृष्टया विचलित  झाले आहेत आणि आवश्यक ती कारवाई करण्याची आमची मागणी आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button