Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शिवसेना आमदारांसह अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

- दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची शरद पवारांकडे मागणी
- राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधून नातेवाईकांना प्रत्येकी एक लाखांची मदत
रत्नागिरी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चिपळूणच्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी घटनास्थळाची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हीच मृतांना श्रद्धांजली असेल अशी मागणी ग्रामस्थांनी शरद पवारांना केली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधून प्रत्येकी एक लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिवरे धरण फुटले. यामध्ये 23 जणांचा बळी गेला आहे. धरण फुटीनंतर संबंधित अधिकारी व शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती. दरम्यान शरद पवारांनी या दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली.