मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,346 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची 1,58,756 वर
मुंबई | मध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,346 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,58,756 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे 887 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत एकूण 1,25,906 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 24,556 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 7939 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 36 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 28 रुग्ण पुरुष व 14 रुग्ण महिला होत्या. 27 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 15 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.07 टक्के आहे. 7 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या या 8,43,691 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 65 दिवस झाला आहे.