ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीचे उद्घाटन अखेर १७ फेब्रुवारीला होणार

मुंबई | मुंबई ते नवी मुंबई जल प्रवासासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.१७ फेब्रुवारीला केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन केले जाणार, त्यानंतर ही सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. ही सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपन्यांवर असणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३२ आसनी, ४० आसनी आणि ५० आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे. डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूरमार्गे पुढे माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि एलिफंटापर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाला २९० रुपये आकारण्यात येतील. तर महिन्याच्या पासासाठी १२ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात करण्याची घोषणा गेल्या वर्षी सरकारने केली होती.त्यानुसार महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट आणि सागरी महामंडळ युद्धपातळीवर कामाला लागले होते.परंतु कोरोनामुळे जेट्टी उभारण्याचा कामात अडथळा निर्माण झालेला होता.पण आता सगळी तयारी पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button