breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई शेअर बाजाराने फ्रान्सला मागे टाकले! जगात ६व्या स्थानावर झेप

मुंबई – जानेवारीपासून मुंबई शेअर बाजारात जोरदार तेजी आली आहे. यात महिन्याला निर्देशांक १,००० अंकांनी वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९,००० अंकांची वाढ झाली आहे. गुरुवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५९ हजारांचा टप्पा ओलांडला. बाजाराने आतापर्यंत २३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. परिणामी बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच गती मिळणार असल्याची ही सुचिन्हे असल्याचे जाणकार मानतात.

मुंबई शेअर बाजारात २०२०च्या सुरुवातीला दोन वेळा लोअर सर्किट लागले होते. त्यानंतर पुन्हा शेअर बाजाराची घोडदौड सुरू झाली. ती अद्याप कायम आहे. कोरोना काळातही शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. २१ जानेवारी २०२१ रोजी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५० हजारांचा आकडा ओलांडला. ५ फेब्रुवारीला ५१ हजार, १५ फेब्रुवारीला ५२ हजार, २२ जूनला ५३ हजार, ४ ऑगस्टला ५४ हजार, १३ ऑगस्टला ५५ हजार, १८ ऑगस्टला ५६ हजार, ३१ ऑगस्टला ५७ हजार, ३ सप्टेंबरला ५८ हजार आणि १६ सप्टेंबरला ५९ हजारांचा टप्पा ओलांडला. यामुळे जगातील पहिल्या ७ प्रमुख शेअर बाजारांमधील फ्रान्सला मागे टाकून भारतीय शेअर बाजाराने ६ वे स्थान पटकावले. अमेरिकेचा शेअर बाजार जगात पहिल्या स्थानावर असून चीनचा दुसऱ्या स्थानावर आहे. जपान, हॉंगकॉंग, ब्रिटन आणि त्यानंतर भारताचा नंबर लागतो. फ्रान्सचा शेअर बाजार ७ व्या क्रमांकावर गेला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास यातून स्पष्ट होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button