Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक पुलावरून कोसळला; दोन जण गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणारा एक कंटेनर एक्सप्रेस वेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलावरून दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील उतारावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रक पुलावरून कोसळल्याचा आवाज येताच आसपासच्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच पोलिसांनाही या अपघाताबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, अपघातात गंभीर जखमी असलेल्या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button