Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

Mumbai Local : हार्बर मार्गावर आज दोन तासांचा इमर्जन्सी ब्लॉक; ‘हा’ आहे पर्यायी मार्ग

मुंबईः मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाची संततधार कायम आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळं भिंतीची पडछड, दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मशीद स्थानकालगत आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मशीद स्थानकालगत रहिवासी भागातील भिंतीचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला. यामुळे काही मिनिटांसाठी लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या भिंतीचा भाग सुरळीत करण्यासाठी आज हार्बर मार्गावर इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मशीद स्थानकालगत असलेल्या खासगी भिंतीचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानंतर काही मिनिटांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. १५ मिनिटांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मशीद स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी मातीचा ढिगारा बाजूला करुन रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला केला होता.मात्र, खासगी भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.

वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा भाग सुरक्षित करण् महत्त्वाचे असल्याने थोड्यात वेळात हार्बर मार्गावर दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या इमरजन्सी ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावर ट्रेन उपलब्ध राहणार नाहीत, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ब्लॉकच्या दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला, दादर येथून मेनलाइनवर प्रवास करु शकतात, असंही रेल्वे प्रशासनानं नमूद केलं आहे. इमरजन्सी ब्लॉकची वेळ अद्याप रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button