breaking-newsक्रिडामुंबई

Mumbai Carrom Competition : काजल, विकास, ओजसची विजेतेपदाला गवसणी

सेंट्रल रेल्वे वेल्फेअर सभागृह, माटुंगा येथे रंगलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत काजल कुमारी, ओजस जाधव व विकास धारिया यांनी अनुक्रमे महिला, पुरुष आणि कुमार गटात विजेतेपदाला गवसणी घातली.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात, इंडियन ऑइलच्या काजलने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेचा २५-६, २५-१८ असा धुव्वा उडवत अपेक्षित यश संपादन केले. त्यापूर्वीच्या उपांत्य लढतीत काजलने मिताली पिंपळेला २५-३,२५-८ अशी सहज धूळ चारली होती, तर नीलमने जान्हवी मोरेला २५-१२, २५-० असे सहज हरवून अंतिम फेरी गाठली होती.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात महानगरपालिकेच्या विकासने वरळी स्पोर्ट्स क्लबच्या फहीम काझीला २५-०,१९-१३ असे पराभूत करत जेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत विकासने राहुल सोलंकीला १९-१७, २५-० असे हरवले होते तर फहीमने अभिषेक भारतीला १८-१४, २३-८ असे नमवले होते.

कुमार गटात (१८ वर्षांखालील) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजसने मिहिर शेखला रोमहर्षक अंतिम लढतीत १३-६, ७-१२, २२-७ असे हरवून विजेतेपद मिळवले. आता २५ मार्चपासून वाराणसी येथे फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button