breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Motorola चे दोन स्मार्टफोन 9 मार्चला लॉन्च होणार; काय आहेत फिचर्स आणि किंमत?

Motorola आपले दोन नवीन स्मार्टफोन Moto G10 Power आणि Moto G30 भारतात लॉन्च करणार आहे. मोटोरोला हे फोन 9 मार्चला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. Moto G10 Power आणि Moto G30 स्मार्टफोन पूर्वी युरोपमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. आता कंपनी दोन्ही फोन भारतीय बाजारात आणणार आहे.

Moto G10 Power चे स्पेसिफिकेशन

Moto G10 Power या फोनमध्ये 60 Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रो-एसडी कार्डसह मेमरी वाढवू शकता. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48 एमपी प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स, 2 एमपी मायक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर आहेत. फोनमध्ये 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी, यात 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. तसेच, 4 जी, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यासारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आल्या आहेत.

Moto G30 चे स्पेसिफिकेशन

Moto G30 या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचा रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. आपण मायक्रो-एसडी कार्डसह स्टोरेज वाढवू शकता. क्वॉड कॅमेरा सेटअप मोटो जी 30 मध्ये देण्यात आला आहे. ज्यात 64 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर आहेत. सेल्फीसाठी यात 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट अशी वैशिष्ट्ये आहेत.

Moto G10 Power आणि Moto G30 ची किंमत

भारतात या दोन स्मार्टफोनची किंमत काय असेल याबद्दल माहिती नाही. परंतु युरोपमध्ये मोटोरोलाच्या मोटो जी 30 ची किंमत 180 युरो म्हणजेच सुमारे 15,900 रुपये आहे. त्याचबरोबर मोटो जी 10 ची किंमत 150 युरो म्हणजेच सुमारे 13,300 रुपये आहे. अशा परिस्थितीत भारतात या दोन फोनची किंमत 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते, अशी अपेक्षा आहे. मोटोरोलाचे हे दोन्ही फोन रिअलमी, रेडमी, व्हिवो, ओप्पो आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करतील. बजेट सेगमेंटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 21 या फोनशी थेट स्पर्धा करु शकते.

Samsung Galaxy M21 चे फिचर्स

Samsung Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आहे. यात ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये सेल्फीसाठी 48 एमपी प्राइमरी कॅमेरा आणि 20 एमपीचा फ्रंट कॅमेरा पंच होल डिस्प्लेसह देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास आपण फोनची मेमरी 512 जीबीपर्यंत वाढवू शकता. या फोनला 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 14,999 रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button