breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Motorola ने लाँच केले ४ नवे Smart TV,१५ ऑक्टोबर पासून विक्री

नवी दिल्ली – प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनी मोटोरोलाने स्मार्ट टीव्हीची नवी रेंज लाँच केली आहे. हे स्मार्ट टीव्ही ३२ इंच, ४० इंच, ४३ इंच आणि ५५ इंचाच्या स्क्रीन साईजमध्ये आणले आहेत. ३२ इंचाचा स्क्रीन एचडी, ४० इंचाचा स्क्रीन फुल एचडी, ४३ इंच आणि ५५ इंच स्क्रीन ४के रिझॉल्यूशन सपोर्ट करते. कंपनीचे हे नवीन स्मार्ट टीव्ही अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. याची विक्री १५ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे.

किंमत किती
Motorola Revou 55 इंचाचा अल्ट्रा एचडी टीव्हीची किंमत ४० हजार ९९९ रुपये आहे. Motorola Revou च्या ४३ इंचाचा अल्ट्रा एचडी टीव्हीची किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे. तर ३२ इंचाचा Motorola ZX2 टीव्हीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४३ इंचाचा Motorola ZX2 ची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.

या स्मार्ट टीव्हीचे फीचर्स
हे सर्व स्मार्ट टीव्ही अँड्रॉयड १० वर काम करतात. यात 1.5GHz क्वाड कोर प्रोसेसर, 2 जीबीचे रॅम आणि Mali-G52 जीपीयू दिला आहे. मोटोरोला ZX2 रेंज मध्ये 16 जीबी चे इंटरनल स्टोरेज आणि मोटोरोला Revou रेंज मध्ये 32 जीबी चे स्टोरेज दिले आहे. हे सर्व टीव्ही डॉल्बी एटमॉस, डॉल्बी ऑडियो, डॉल्बी स्टूडियो साउंड, डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर १० सपोर्ट करते.

५५ इंचाचे मॉडलमध्ये दोन स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स सोबत ५० वॉट साउंड आउटपूट मिळते. तर ४३ इंचाच्या दोन स्पीकर्स सोबत २४ वॉटचे साउंड आउटपूट दिले आहे. मोटोरोला ZX2 रेंजमध्ये दोन स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स सोबत ४० वॉटचे साउंड आउटपूट दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button