पिंपरी / चिंचवडपुणे

रहाटणीमध्ये मायलेकीची आत्महत्या; लेकीच्या आत्महत्येचे गूढ

पिंपरी l प्रतिनिधी

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. तर तिच्या मुलीने देखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना शनिवारी (दि. 18) सज्जनगड कॉलनी, काटे पिंपळे, रहाटणी येथे घडली.

सुनीता युवराज नवले (वय 34), श्रावणी अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. याप्रकरणी सुनीता यांचा भाऊ प्रमोद सदाशिव बहिरट (वय 34, रा. बोपोडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा पती युवराज राजाराम नवले (वय 37, रा. रहाटणी), वैशाली जाधव (रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहीण सुनीता यांना आरोपी युवराज याने घरगुती किरकोळ कारणांवरून वाद घातला. तिला घालून पाडून बोलणे तसेच ‘माझ्या घरात राहू नको. घरातून निघून जा. मला घटस्फोट दे’ असे म्हणत तिला घरात पत्नीची वागणूक दिली नाही. या त्रासाला कंटाळून सुनीता यांनी आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांची मुलगी श्रावणी हिने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button