ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या सुश्राव्य गायनाने मोरया भक्त मंत्रमुग्ध

पिंपरी चिंचवड | श्रीमान् महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गुरुवारी(23 डिसेंबर) राष्ट्रीय पुरस्कार विजेते विख्यात गायक महेश काळे यांचे सुश्राव्य गायन झाले. काळे यांच्या सुश्राव्य गायनाने मोरया भक्त मंत्रमुग्ध झाले. यंदाचा हा 460 वा संजीवन समाधी महोत्सव असून त्याची सुरुवात 21 डिसेंबर रोजी झाली.या महोत्सवात गायनसेवा सादर करताना महेश यांनी सुरुवातीला ‘जय जय रामकृष्ण हरी’ हा नामगजर केला. त्यानंतर ‘जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार’ हा अभंग सादर केला. भक्तीरचना सादर करताना नंतर ‘सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी पुंडलिका पाठी उभे ठाके’ हा अभंग सादर केला.

नंतर हे ‘गणराज महाराज, गजानना विद्याधीशा’ हे गणेश स्तवन सादर केले. या स्तवनाच्या शेवटाकडे जात असताना त्यातच ‘सूर निरागस हो’ या गीताचे सूर मिसळले आणि त्यातच ‘मोरया मोरया’चा गजर करुन उपस्थितांना भक्तीरसात चिंब भिजवले. नंतर ‘सूर सूर चैतन्याचा रोम रोम न्हाले, परब्रह्म भेटीलागी धरेवरी आले’ हा अभंग सादर केला.

ब-याच दिवसांनी महेश काळे यांचे सुमधुर गायन ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक होते. त्यांना आपल्या गायनात सामील करुन घेत महेश काळे यांनी उपस्थितांना आपल्या दमदार गायनाने मंत्रमुग्ध करुन टाकले. मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button