breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉक करणारे 37 पॉझिटिव्ह

पिंपरी |महाईन्यूज|

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्येत कमी होत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने थोडाफार सुटकेचा निश्वास सोडला आहे. परंतू, शहरांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजे काळी बुरशी (Black fungus) या आजाराने ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात लाॅकडाऊनमध्ये माॅर्निग वाॅक करणारे 37 जण पाॅझिटिव्ह आढळून आहेत. निष्काळजीपणे बाहेर फिरुन कोरोना संसर्ग वाढवणा-या विरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोना प्रतिबंधक तसेच लॉकडाउनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्यावर भर द्यायला सुरवात केली आहे. त्यानूसार मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी ७० पैकी ३७ नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मॉर्निंग वॉकनिमित्त रस्त्यांवर फिरणाऱ्या या सर्व ७० नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी ३७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. विकेंड लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात आली नसल्याने शासनाकडून निर्बंध आणखी कडक करण्यात येत आहेत. मृतांची संख्या वाढत चालली आहे. असे असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पिंपरीतील मोशी प्राधिकरण, पीसीएनटीडीए सर्कल, मोशी, भोसरी येथील नागरिक मॉर्निंग वॉकनिमित्त घराबाहेर पडले. यावेळी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या नागरिकांवर कारवाई केली.

पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शहरातील १२ ठिकाणी नाका बंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी ५९३ दुचाकी चालकांचीही चौकशी करण्यात आली. त्यापैकी काही दुचाकी चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चाफेकर चौक आणि जमतनी चौक दुचाकी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल डेरे, दिनेश मुंडे, जयदीप खांबट, सागर कोळी, पुना हगवणे आणि सुनील कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच नागरिकांना कोरोना रोखण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button