TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील २५ हजारहुन अध‍िक विद्यार्थ्यांनी केला ‘मी स्वच्छाग्रही’चा संकल्प – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह मोहिमेद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

पिंपरी चिंचवड | नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छाग्रह मोहिम राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने स्मार्ट सारथीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असून शहरातील मनपा व खासगी शाळांतील मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती होण्यासाठी ‘मी स्वच्छाग्रही’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास २५ हजाराहुन अध‍िक विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा करीत स्वच्छतेचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक, शैक्षण‍िक संस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

देशात सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहराचा देशात पहिल्या तीन शहरांमध्ये नावलौकीक करण्याचा मानस असून त्यासाठी मनपा अध‍िकारी- कर्मचारी व मनपाकडून सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छतेबाबत शहरात चळवळ निर्माण होण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना पुढाकार घेत आहेत. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लाक्षण‍िय आहे. स्वच्छाग्रह मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपले घर, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. स्वत: स्वच्छतादूत म्हणून पुढे येत आहेत. लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती विद्यार्थी करीत आहेत. तसेच, स्वच्छतेचे पालन करण्याविषयी शहरात ठिकठिकाणी प्रबोधन केले जात आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे. शाळांच्या प्राचार्यांकडूनही विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबतचे शिक्षण दिले जात असल्याच्या प्रतिक्रीया पत्राद्वारे प्राप्त होत आहेत. स्वच्छता मोहिमेत पिंपरी चिंचवड शहराचा देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांचा सहभाग करून घेण्यात आलेला आहे. नागरिकांनी देखील स्वत:हुन पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या वतीने “मी स्वच्छाग्रही” हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली आहे. विद्यार्थ्यांकडून आपली शाळा, घर आणि शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लागणार आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागेल. आम्ही शहराचे देणे लागतो, या अत्यंत चांगल्या उपक्रमाबद्दल महापालिकेचे मनपूर्वक आभार..

– मा. सौ. सुनिता नवले,
प्राचार्या, श्री फत्तेचंद जैन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, चिंचवड.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. च्या वतीने “मी स्वच्छाग्रही” या अत्यंत चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यालयातील इयत्ता ५ ते १२ वीच्या ४ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये शपथ घेतली. भविष्यात देखील या उपक्रमाला आमच्या विद्यालयाच्या वतीने सहकार्य राहील.

– मा. सुनील लाडके,
प्राचार्य, श्री म्हाळसाकांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, निगडी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button