Uncategorizedपश्चिम महाराष्ट्र

‘आयएसी इंडिया’ कंपनीतील कामगारांना ‘मान्सून गिफ्ट’

आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी

कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेत वेतनवाढ करार

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील आयएसी इंडिया प्रा. लिं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ‘मान्सून गिफ्ट’ मिळाले आहे. स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये वेतनवाढ करार झाला असून, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीतील कर्मचाऱ्यांना चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक १९ हजार २६७ रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या तिसरा वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, कामगार आयुक्त सुनील बागल, कामगार उपआयुक्त संभाजी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, प्रशांतआप्पा पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, विजय पाटील, दत्तात्रय गवारे, दत्ता येळवंडे, कुणाल कोळेकर, प्लॅन्ट १ युनिट अध्यक्ष सचिन लांडगे, उपाध्यक्ष विनोद दौंडकर, सरचिटणीस प्रविण गव्हाणे, सहचिटणीस धनंजय झापर्डे, खजिनदार अमित दुधाने, प्लॅन्ट नं. २ युनिट अध्यक्ष उमेश वाडेकर, सरचिटणीस गणेश पापरे, खजिनदार चेतन हुले, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे एच. आर. डायरेक्ट इंडिया हेड दिपाली खैरनार, प्लॅन्ट १ चे प्लॅन्ट हेड. पवन मालसे, प्लॅन्ट २ चे प्लॅन्ट हेड सिनोज मॅथ्यू, एच आर मॅनेजर अनिकेत निळेकर, एच. आर. मॅनेजर ओंकार बडवे, महेश सावंत, गायत्री जोशी, कुमुदसिंग यांनी सह्या केल्या.
प्रास्ताविक एच. आर हेड अनिकेत निळेकर यांनी केले. तसेच, सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारांनी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलीलप्रमाणे :
कामगारांना एकूण पगारवाढ १९ हजार २६७ रुपये इतकी मिळणार आहे. पगाराचा रेशो पहिल्या वर्षी ७०% दुसऱ्या वर्षी १५% तिसऱ्या वर्षी १५% मिळणार आहे. कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी, मृत्यू साहाय्य योजना, मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला पुढील पॉलिसी प्रमाणे कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार आहे. अपघातात अपंगत्व आल्यास मदतनिधी, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलीसी, सुट्टी, मतदानाची सुट्टी, सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या व्यतिरीक्त २०% या प्रमाणे देण्यात येईल. मासिक हजेरी बक्षीस, सेवा बक्षीस, कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस, वैद्यकीय कर्ज सुविधा, ड्रेस, गुणवंत कामगार पुरस्कार आदी सुविधा कामगारांना देण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button