breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळात मान्सून दाखल, भारतीय हवामान खात्याने दिली माहिती

मुंबई – केरळच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला असून नैऋत्य मोसमी पाऊस सुरू झाला आहे. केरळमध्ये पाऊस १ जूनलाच दाखल होणार होता. मात्र, वातावरणीय बदलामुळे पाऊस पडायला दोन दिवस उशीर झाला. अखेर, केरळमध्ये पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे कार्यकारी संचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार केरळच्या दक्षिण भागात मान्सून धडकला आहे.

भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button