breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

माझे फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली |

फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरला एक पत्र लिहिलंय. राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे, की ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म भारत सरकारच्या दबावाखाली त्यांचे नवीन फॉलोअर्स न वाढू देता. ते मर्यादित करण्याचा प्रयत्न करतंय. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांचं ट्विटर अकाउंट लॉक झाल्यापासून त्यांचे फॉलोअर्स होते तेवढेच असून वाढत नाहीयेत, असं त्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात २७ डिसेंबर रोजी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले असून ते मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप केला.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरला काही तपशीलवार माहिती पाठवली आहे. त्यातून त्यांनी निदर्शनास आणून दिले की पूर्वी दरमहा सरासरी २.३ लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्स वाढत होते. काही महिन्यांमध्ये तो आकडा वाढून ६.५ लाखांपर्यंत गेला होता. परंतु ऑगस्ट २०२१ पासून, म्हणजेच अकाउंट अनलॉक झाल्यापासून त्यांचे महिन्याला केवळ २५०० फॉलोअर्स वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत आपले १ कोटी ९५ लाख फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय.

राहुल गांधी यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे छायाचित्र ट्विट केल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट वादात सापडले होते. पीडितेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्विट करून त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आला. नंतर, कायद्याचं उल्लंघन झाल्याचं म्हणत राहुल गांधींचं अकाउंट एका आठवड्यासाठी लॉक करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी पराग अग्रवाल यांना लिहिले, “ट्विटर भारतातील हुकूमशाहीच्या वाढीस सक्रियपणे मदत करत नाही, याची खात्री करण्याची तुमची मोठी जबाबदारी आहे. “जगभरातील उदारमतवादी लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील वैचारिक लढाई सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उदयास येत आहे. यामुळे ट्विटर सारख्या कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी येते,” असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button