पिंपरी / चिंचवड

भक्ती शक्ती चौकात कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन, रोख रक्कम चोरली

पिंपरी | प्रतिनिधी

भक्ती शक्ती चौक निगडी येथील बस स्टॉपवर मंगळवारी (दि. 17) पहाटे साडेतीन वाजता तीन चोरट्यांनी एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. तरुणाकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेली.

उमाशंकर राजबहादूर त्रिपाठी (वय 29, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी भक्ती शक्ती चौकातील निगडीकडे जाणाऱ्या बाजूला बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी तिथे मोपेड दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. कोयत्याच्या उलट्या बाजूने कमरेवर व पायावर मारून फिर्यादीकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 17 हजार 650 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button