breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

बृजभूषण सिंह प्रकरणावर मनसेची तिखट प्रतिक्रिया

भाजप बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करेल याची शक्यता कमी

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिक शोषणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू असतानाच आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे.

बृजभूषण हा गुंड प्रवृत्तीचा आहे. ज्या महिला कुस्तीपट्टूंनी आरोप केले, त्यांच्यापैकी एक साक्षी मलिक आहे. असे लोक भाजपमधील असतील, तर २०२४ मध्ये कसं होईल. भाजपचं यावर काय म्हणण आहे. भाजप यावर मुग गिळून बसलं आहे. मात्र भाजप त्यांच्यावर कारवाई करेल याची शक्यता कमी आहे. कारण बृजभूषण सिंग उत्तर प्रदेशातील शिक्षणसम्राट आहे. बाहुबली नेता आहे. यावर आता भाजपच्या महिला आघाडीनेच उत्तर द्यावं, असं आवाहन मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बुधवारी रडत रडत, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही हस्तक्षेप करावा अशी मागणी विनेश फोगटने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button