breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मनसेचे नेते वसंत मोरे यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका…वाचा काय म्हणाले?

पुणे | प्रतिनिधी

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी सडकून टीका केली आहे. पुणे भाजपने चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस दिमाखात साजरा केला. यानिमित्ताने शहरातील ठिकठिकाणी फ्लेक्सबाजीही करण्यात आली. ऐन कोरोना काळात सामाजिक मदत उभा करण्यास दुर्लक्ष करणारे पाटील वाढदिनी विविध उपक्रम घेण्याचे आदेश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देतात. यावर वसंत मोरे यांनी तोंडसुख घेतले आहे. वाचा त्यांच्याच शब्दात…

कधी- कधी पुण्याच्या काही जावई नेत्यांची (कोल्हापूर) कीव करावीशी वाटते,
जेव्हा पुणेकरांना ऑक्सिजन बेड , व्हेंटिलेटर बेड, रेमडीसीवर याची गरज होती तेव्हा पुण्यात एक हाती सत्ता असताना एकाही नगरसेवकाला हॉस्पिटल टाक किंवा वरील विषयात मदत कर म्हणून सांगितले नाही.

पण कोरोना संपल्यावर स्वता:च्या वाढदिवसाला मात्र पुण्यातील रिक्षावाल्या काकांची आठवण झाली आणि २०० रुपयांचा गॅस मात्र भिकेमध्ये नगरसेवकांना देण्याचे आदेश दिले आणि आम्ही ही पुणेकर लाईन लावून त्या भिकेचे टोकन घेऊन आलो.

https://www.facebook.com/255049118412693/posts/884248058826126/

आरे त्यांना बोलायला पाहिजे होते,
हिम्मत असेल ना तर माझ्या पोराच्या शाळेची फी खूप आलीय ती भर ,
आई ,बापाला कोरोना झाला होता त्या डॉक्टरची उधारी बाकी आहे ती फेड ,
गाडीचे ३ हप्ते थकले आहेत ते तरी दे ,
लाईट बिल भरले नाही म्हणून लाईट कट झाली आहे ती तरी जोडून दे बघू दिले असते का ?

नाही पण हितेच आपण चुकतो…

हीच चूक जर यावेळी २०२२ ला महानगरपालिकेच्या निवडणुकीत केली तर तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button