TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी मनसेचे महापालिकेत आंदोलन

पिंपरी चिंचवड | “पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना फसवू नका, फसवू नका”, “पाणी द्या, पाणी द्या, 24 तास पाणी द्या”, “प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणा देत मनसेने महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मनसेने आज (मंगळवारी) आंदोलन केले.मनसेचे गटनेते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहरसचिव रुपेश पटेकर, महिला अध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, श्रद्धा देशमुख आदी मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे.

नोव्हेंबर 2021 पासून दररोज पाणीपुरवठा केला जाईल असे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते. पण, नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला. तरी, पाणीपुरवठा दररोज सुरू केला जात नाही. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असून 24 तास पाणीपुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button