ताज्या घडामोडीमुंबई

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंवर आमदार राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप

मुंबई |  सातारच्या ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचावर सोलापूर बार्शीचे भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सातपुतेंवर आरोप केला आहे की, त्या अवैध धंद्यांना मदत करुन हप्ते गोळा करतात. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. राऊत यांच्या आरोपानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार राऊत यांनी आरोप केला की, तेजस्वी सातपुते गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती घालून त्रास देतात. त्यांच्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये अवैध दारू, गुटखा, वाळू तस्करीचे प्रमाण वाढून गुन्हेगारी वाढली आहे. म्हणून याला जबाबदार असलेल्या सोलापूर पोलीस अधीक्षक सातपुते यांच्यावर कारवाई करावी, असे विधिमंडळ अध्यक्षांच्या पुढे प्रश्न उपस्थित करून लेखी तक्रार केली आहे. आमदार राऊत यांनी विधीमंडळ अध्यक्षांसमोर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, सातपुते या अवैध धंद्यांना मदत करून हप्ते गोळा करतात आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. याची लेखी तक्रारही राऊत यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी कराडमधील एक सर्वसामान्य व्यक्तिवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केला होता. सातारच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला मोक्का लागला असताना तो मोठी तडजोड करून काढून टाकल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button