breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’

  •  शिरुर लोकसभा मतदार संघातील आजी-माजी खासदारांना पत्र
  •  पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विमानतळासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

पिंपरी । प्रतिनिधी

पुण्यातील नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ शिरुर लोकसभा मतदार संघातील खेड तालुक्यात व्हावे. यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून प्रयत्न करुयात, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

याबाबत आजी-माजी खासदारांना आमदार लांडगे यांनी पत्र लिहीले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शिरूर लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ खेड तालुक्यात व्हावे. यासाठी आपण सर्वांनी पक्षीय मतभेद विसरून प्रयत्न करायला हवेत. प्रस्तावित विमानतळ पुरंदर येथे जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी खेड तालुक्यात विमानतळ उभारण्यासाठी आपण आग्रही मागणी केली होती.

दरम्यान, राज्य सरकारने पुरंदरमध्ये विमानतळाची जागा निश्चित केली. पण, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकारने निर्धारित केलेल्या जागेला ना हरकत परवानगी दिली नाही. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने खेड तालुक्यात विमानतळ उभारण्याची संधी पुन्हा निर्माण झाली आहे. त्यासाठी आपण सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिकेत राजकीय जोडे बाजूला ठेवून बैलगाडा शर्यत लढ्याप्रमाणे एकत्र येणे अपेक्षीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठकारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपआपल्या पक्षाचे नेते म्हणून आजी-माजी खासदारांनी पाठपुरावा करावा, असेही आमदार लांडगे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

  • पिंपरी-चिंचवडसह शिरुरच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल : लांडगे

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. उद्योगनगरी आणि कामगारनगरी असलेल्या या शहरामध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. तळवडे आणि हिंजवडी हे दोन मोठे आयटी पार्क, तसेच इंटरनॅशनल ऑटो हब असलेले तळेगाव, चाकण आणि रांजणगाव या औद्योगिक वसाहती पिंपरी-चिंचवडच्या भोवती आहेत. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडची ओळख संपूर्ण जगभरात आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालायची असेल आणि येथील इंडस्ट्रिअल व रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित होण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यायचा असेल, तर शहरालगत असलेल्या खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणे गरजेचे आहे, अशी आमची भूमिका आहे. आगामी काळात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराधित्य सिंधिया यांची भेट घेणार आहे. सर्वांच्या सहकार्याने खेड तालुक्यात विमानतळ झाल्यास पिंपरी-चिंचवडसह शिरुर लोकसभा मतदार संघातील औद्योगिक पट्यातील शाश्वत विकासाला मोठी चालना मिळेल, असा दावाही आमदार लांडगे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button