TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदिवासी शाळांना आमदार लांडगेंचा ‘एक हात मदतीचा’

  •  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त

पिंपरी । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील आदिवासी शाळांमध्ये शैक्षणिक आणि आवश्यक साहित्याची मदत करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.
वाढदिवसानिमित्त राज्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी अनावश्यक खर्च न करता सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करावे. त्याद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. २०१५ पासून विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची भूमिका फडणवीस यांनी ठेवली आहे. त्या भूमिकेला अनुसरुन प्रत्येकवर्षी आमदार लांडगे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करतात. यावर्षी देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. त्यापार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आदिवाशी शाळांमध्ये मदत देण्याचा संकल्प आमदार लांडगे यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरोशी, ता. खेड, शिवाजी विद्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालय, डेहणे, ता. खेड, शिवशंकर विद्यालय व चिंतामनराव मोरमारे कनिष्ठ विद्यालय, तळेघर, ता. आंबेगाव, श्री. पंढरीनाथ कला- वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मु.पो. पोखरी, ता. आंबेगाव, विश्व हिंदू परिषद वनवासी विद्यार्थी वसतीगृह, राजगुरूनगर, ता. खेड, कुंडेश्वर विद्यालय, पाईट, ता. खेड, सेवाग्राम ट्रस्ट माळेगाव, ता. मावळ, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, भरतवाडी, कल्याण आश्रम, पोखरी, ता. आंबेगाव, आदी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू भेट स्वरुपात देण्यात येणार आहेत.
आमदार लांडगे म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची बहुमताने निवड झाली. देशातील वंचित, शोषित आणि आर्थिक मागास समाजासाठी ही विशेष आनंदाची बाब आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही प्रतिवर्षी विधायक उपक्रम घेवून साजरा करीत असतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button