पिंपरी / चिंचवड

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

दारू पिताना झालेल्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना जगतापनगर, थेरगाव येथे नदीच्या कडेला स्मशानभूमीजवळ शनिवारी (दि. 1) रात्री अकरा वाजता घडली.

व्यंकटेश सुरेश नाईक (वय 23, रा. काळेवाडी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मितेश उर्फ बाबू कदम (रा. पडवळनगर, थेरगाव), चि-या उर्फ अक्षय पासलकर (रा. थेरगाव गावठाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी व्यंकटेश त्यांच्या घरी होते. त्यावेळी आरोपी मित्रांनी त्यांना त्यांच्या दुचाकीवरून जगतापनगर येथे नदीच्या किनारी दारू पिण्यासाठी नेले. दारू पिल्यानंतर दारू पिण्याच्या कारणावरून दोन्ही मित्रांनी व्यंकटेश यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात व्यंकटेश जखमी झाले आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button